आठवडाभर चाललेल्या यात्रा उत्सव काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी या परिसराची स्वच्छता केली. कचरा आरोग्यास घातक ठरू शकतो या विचाराने ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ केला. यावर्षी यात्रोत्सवाचा मान आवर्तन पद्धतीने पाथरे बुद्रुक या गावाकडे आला होता. यात्रा संपल्यानंतर गावातील खंडोबा मंदिर, दत्त मंदिर परिसर स्वच्छ करून घेतला. हातात झाडू, पाट्या, कचरा वाहून येणारा गाडा घेऊन ग्रामस्थांनी दोन-तीन एकराचा परिसर स्वच्छ केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता अभियान राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पाथरे बुद्रुक यात्रा समितीचे अध्यक्ष अरूण नरोडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चिने, विकास संस्थेचे सचिव भाऊसाहेब नरोडे, संपत चिने, संतोष बारहाते, तुषार खेडकर, डॉ. योगेश सोनवणे, निखिल घुमरे, बापू चिने, दत्तात्रेय सगर, प्रकाश चिने, शंकर चिने, कैलास माळी आदींसह ग्रामस्थ व यात्रा समिती सदस्य यांनी सहभाग घेतला.
यात्रोत्सवानंतर पाथरेत राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 6:04 PM