शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

पुन्हा २८ नवे रूग्ण : शहरात चौघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 9:45 PM

शुक्रवारी (दि.५) दिवसभरात महापालिका हद्दीतील विविध उपनगरांमध्ये एकूण २० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. यावरून शहरातील कोरोना संक्रमणाचा वेग सहज लक्षात येऊ शकतो.

ठळक मुद्देशहरात आतापर्यंत १३३ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३४५

नाशिक : महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शनिवारी (दि.६) शहरात एकूण नवे २८ कोरोनाबाधित आढळून आले तर यापुर्वी उपचारार्थ दाखल असलेल्या चौघा रूग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.५) दिवसभरात महापालिका हद्दीतील विविध उपनगरांमध्ये एकूण २० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. यावरून शहरातील कोरोना संक्रमणाचा वेग सहज लक्षात येऊ शकतो. तसेच शहरात आतापर्यंत १३३ रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहे. शहरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३४५पर्यंत जाऊन पोहचला. यापैकी १९४ रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. शहरातील एकूणच व्यवहार सुरळीत होत असून शनिवारी शहरातील बाजारपेठा अचानकपणे गजबजून गेलेल्या दिसून आल्या. लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आणि कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारकडून सुचविलेले सर्वच उपाययोजना आणि नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र पहावयास मिळाले, जर अशीच परिस्थिती राहिली तर ही मोठ्या धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.---...येथे आढळले आज २८ रूग्णशनिवारी शहरातील ६० पैकी २८ कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये गंगापूर रोड येथे पुन्हा एक रूग्ण, पंपिंग रोडवर १, पंडित कालनी १, दिंडारी नाका १, सरदार चाक १, माडसांगवी १, सारडा सर्कल १, नाईकवाडी पुरा ३, पेठराड २, पंडित नगर सिडको २, कोणार्कनगर १, वडाळानाका येथील मोठा राजवाडा ३, जुने सिडको १, देवळाली कॅम्प १, नागचौक १, भवानी प्रसाद रो -हाऊस १, टाकळी रोड १, विधाते नगर, अशोका मार्ग १, गुलमोहर नगर, म्हसरूळ १, गंजमाळ १, सिन्नरफाटा १, राजेंद्र कॉम्प्लेक्स, नाशिकरोड १ असे २८ रूग्ण करोनाबाधित आहेत.---या भागातील चौघा रूग्णांचा मृत्यूमहापालिका रूग्णालयांत उपचार घेणार्या शहरातील चार कोरोनाबाधितांचा शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला. जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा अजमेरी मशिदीजवळ राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. पखालरोडवरील हॅप्पीहोम कॉलनीजवळ एका ४१वर्षीय पुरूषाचाही मृत्यू झाला. तसेच वडाळाशिवारातील खोडे नगरमधील अक्सा कॉलनी परिसरातील एका ३८वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. गंजमाळ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचाही करोनाने मृत्यू झाल्याची माहिती महापालिका वैद्यकिय विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू