नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निविदेला मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे या विषयास बचत गट आणि काही नगरसेवक यांचा विरोध असतानाही २९ मे रोजी होणाऱ्या येत्या महासभेत हा विषय मांडण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर महासभा काय निर्णय घेते याकडे बचत गटांचे लक्ष लागून आहे.महापालिकेच्या ९० प्राथमिक शाळा असून, त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना सध्या बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. परंतु त्याऐवजी सेंट्रल किचनच्या माध्यमातून परिपूर्ण भोजन देण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार याच महिन्यात निविदा मागवण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असतानादेखील राज्य शासनाने निवडणूक आयोगाची खास परवानगी घेतली होती. त्यानंतर या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे हा विषय महापालिकेच्या महासभेवरदेखील मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विषयावर स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी अगोदरच घोषित केला होता.त्याचबरोबर इगपुरी तालुका तसेच ठाणे येथे सेंट्रल किचनच्या माध्यमातून शाळांना मध्यान्ह भोजन पुरवले जात असून, तेथे पाहणी करण्याचेदेखील ठरविण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच हा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. तसेच निविदाही मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या ९० प्राथमिक शाळा असून, त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निविदेला मुदतवाढ दिली आहे. दुसरीकडे या विषयास बचत गट आणि काही नगरसेवक यांचा विरोध असतानाही २९ मे रोजी होणाºया येत्या महासभेत हा विषय मांडण्यात आला आहे.
‘सेंट्रल किचन’साठंी पुन्हा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:59 AM