मालेगाव मध्य (नाशिक) : नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व एन आरसी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीने आज मौलाना मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ऐतिहासिक किल्ला येथून आज मोर्चा काढण्यात आला.मोर्चा खयबान ए निशात चौक, चंदनपुरी गेट, आझादनगर,मुशावरत चौक, मोहम्मद अली रस्ता मार्गे किदवाई रस्त्यावरील शहिदोंकी यादगार या ठिकाणी पोलिसांनी मोर्चा अडविला.येथे मोर्चाचे सभेत रु पांतर झाले. मोर्चा सकाळी दहा वाजता सुरू झाला. मोर्चाच्या अग्रभागी मौलाना मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, सुफी गुलाम रसुल होते.मोर्चात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते की मोर्चाचे पहिले टोक सभास्थळी होते. शहराच्या इतिहास तीन तलाक विधेयकावरून महिलांचा काढण्यात आलेल्या मोर्चानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले.त्यामुळे शहरातील रस्त्यांना जनसागराचे स्वरु प प्राप्त झाले होते. बंद व मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने बुधवारी सायंकाळी मोर्चा मार्गावर पथसंचलन केले. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली किल्ला, छावणी, शहर पोलीस ठाण्याच्या व बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांनी सशस्त्र संचलन केले होते. मोर्चाप्रसंगी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी प्रांताधिकारी तथा दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी आठ कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची पोलीस ठाणेनिहाय नियुक्ती केली आहे. यात पी. बी. मोरे (शहर), विजय खरे (आझादनगर), रणजित रामा खरे (पवारवाडी), आर. जी. शेवाळे (छावणी), रमेश वळवी (द्याने-रमजानपुरा), एस. जी. सावणे (आयेशानगर), नितीन विसपुते (किल्ला), एल. एम. निकम (कॅम्प) आदिंचा समावेश आहे.
मालेगावी नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:39 PM