शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सोेमवारी निघणार सभेचा अजेंडा?

By admin | Published: May 24, 2015 1:24 AM

सोेमवारी निघणार सभेचा अजेंडा?

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अजेंडा (विषयपत्रिका) येत्या सोमवारी (दि.२५) निघण्याची शक्यता असून, विषयपत्रिका निघाल्यापासून कमीत कमी दहा दिवसांत व जास्तीत जास्त १५ दिवसांत सभा घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कदाचित अध्यक्षपदाची निवडणूक ५ जूनला होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, निवडणुकीनंतर देवाला घातलेले साकडे पूर्ण करण्यासाठी काही संचालकांनी देवदर्शनासाठी नाशिक सोडल्याचे समजते. शिवसेनेचे दोन्ही नवनिर्वाचित संचालक काल (दि.२३) मुंबईला कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे मुंबईबाहेर असल्याने आमदार अनिल कदम व सुहास कांदे यांची कार्यकारी प्रमुखांची भेट होऊ शकली नाही. दिंडोरी तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक गणपतराव पाटील हे शुक्रवारीच जेजुरीला देवदर्शनासाठी रवाना झाले. उद्या रविवारी (दि.२४) इगतपुरी तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संदीप गुळवे हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनाला रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी घेतलेले परिश्रम दूर करण्यासाठी देवळा तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले संचालक केदा अहेर जिल्'ालगतच असलेल्या गुजरातमधील पर्यटनस्थळी गेल्याचे समजते. काही संचालकांनी काल (दि.२३) सायंकाळी नाशिकला हजेरी लावून हिरे गटाशी चर्चा केल्याचे समजते. तर कोकाटे-पिंगळे गटाकडून माजी आमदार दिलीप बनकर बिनविरोध निवडून आलेल्या अपक्ष संचालकांची मनधरणी करीत असल्याचे कळते. मात्र जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद हे बॅँकेतील इमारतीच्या पायऱ्या चढता चढता ठरत असल्याचा अनुभव पाहता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार हे नक्की. त्यामुळे सोमवारी बैठकीची विषयपत्रिका निघाल्यानंतर दोेन्ही गटाकडून संचालकांची पळवापळवी व सहलीचे आयोजन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.(प्रतिनिधी) इन्फो.. दोघा-दोघांचे दबाव गट जिल्हा बॅँकेत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसताच दोेघा-दोेघांनी व तिघांनी दबाव गट करून एकत्र राहण्याची खेळी सुरू केल्याचे समजते. जिल्हा परिषद सदस्य असलेले संदीप गुळवे व सभापती केदा अहेर हे दोन्ही एकाच विचाराने निर्णय घेणार असल्याचे समजते. तिकडे शिवसेनेचे निवडून आलेले आमदार अनिल कदम व सुहास कांदे एकत्र असून ते कोणत्या पॅनलकडे जायचे, याचा एकमताने निर्णय घेणार आहेत.