नाशिक : राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर १२ हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने आक्रमक भूमिका घेत शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले. परंतु बिंदुनामावली, आरक्षण, आंदोलन, न्यायालयीन प्रक्रिया व शिक्षण मंत्र्यांच्या वेगवेगळ्या घोषणा यांसारख्या वेगवेगळ्या अडचणींनंतर अखेर १२ हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. यात त्यापैकी ५ हजार ८२२ उमेदवारांची थेट निवड झाली. परंतु सामाजिक आरक्षणाच्या अडचणीमुळे यातील केवळ २५२४ उमेदवारच निवडले गेले. त्यापैकी ९ ते १२ या स्तरावर खासगी संस्थेची निवड झालेल्या ७७१ उच्च गुणवत्ताधारक शिक्षकांना नियुक्ती मिळू शकली नाही. काही उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये नियुक्ती मिळाली होती. परंतु अद्याप त्यांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही.तसेच शासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात २० नोव्हेंबरपासून पुण्यातील शिक्षण आयुक्तालय परिसरात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. राम जाधव, प्रा. वैभव फटांगरे, प्रा. गोरख भगत यांनी दिला आहे.उमेदवारांचा संयम सुटलाउमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. परंतु, शिक्षण विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातील ७७१ अभियोग्यताधारक रुजू होऊ शकले नसल्याचा आरोप पात्रताधारकांनी केला असून, सर्व पात्रताधारकांचा संयम सुटत असल्याने शिक्षण विभागाने शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने केली आहे.
शिक्षक भरतीसाठी पात्रताधारक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:44 AM