कसबे सुकेणे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलना केले. नाशिक शहर व जिल्हयातही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काळ्या फिती लावुन कामकाज केले. दरम्यान शासनाने दखल घेतली नाही तर गुरूवारी (दि.२८) तीव्र निदर्शने आणि शुक्रवारी (दि. २९) एक दिवसाचा संप करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.संघटनेने प्रामुख्याने, वर्ग ४ ची पदे निरसित करु नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास त्वरित शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, बाह्यस्तोत्राद्वारे ती भरू नयेत, वेतन त्रूटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणा-यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलिस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत, अशा विविध स्वरुपाच्या २५ मागण्या केल्या असून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.यंत्रणा होणार ठप्पशासनाने याप्रकरणी तोडगा काढावा, अन्यथा संपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प होईल, असा इशारा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कामगार महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्यामुळे हा अखेरीचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व शासकीय कारभार चतुर्थश्रेणी कर्मचा-यांशिवाय अशक्य असल्यामुळे सर्व शासकीय कामकाज ठप्प होणार आहे.
चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे आंदोलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 9:03 PM
कसबे सुकेणे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील साडे तीन लाखांहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलना केले. नाशिक शहर व जिल्हयातही चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी काळ्या फिती लावुन कामकाज केले. दरम्यान शासनाने दखल घेतली नाही तर गुरूवारी (दि.२८) तीव्र निदर्शने आणि शुक्रवारी (दि. २९) एक दिवसाचा संप करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
ठळक मुद्देआज निदर्शने : काळ्या फिती लावून कामकाज