नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अंतर राखत देण्यात आले. यामुळे शुक्रवार आंदोलन वार ठरल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे दिलेल्या निवेदनांवर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.मालेगावी कॉँग्रेसचे निवेदनमालेगाव : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलचे वाढते दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा या मागणीसाठी तालुका काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, सरचिटणीस वाय. के. खैरनार, केवळ हिरे, सतीश पगार, रतन शेवाळे आदींनी सहभाग घेतला.येवला येथे कॉँग्रेसची निदर्शनेयेवला : तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर तात्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अनिल खैरे, अॅड. समीर देशमुख, प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, संदीप मोरे, उस्मान शेख, नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब पवार, अमित पटणी, दत्तात्रय चव्हाण, भगवान चित्ते, सतीश सूर्यवंशी, संजय कुराडे धोंडीराम पडवळ, कैलास घोडेराव आदी सहभागी झाले होते.
जिल्हाभर शुक्रवार ठरला आंदोलन वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 9:53 PM
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अंतर राखत देण्यात आले. यामुळे शुक्रवार आंदोलन वार ठरल्याचे चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे दिलेल्या निवेदनांवर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देएल्गार : विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने स्थानिक प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर