सिन्नर : तालुक्यात बुधवारी दिवसभरात पाच वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. बारागावपिंप्री येथे कांदा व वैरण, माळेगाव एमआयडीसीतील कारखान्यात केमिकल, मनेगाव शिवारात दोन घरे, तर सिन्नर-घोटी मार्गावर मालवाहू ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने पाचही घटनांत जीवितहानी झाली नसली, तरी दुपारपासून रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालेल्या अग्नितांडवामुळे अग्निशमन दलास चांगली धावपळ करावी लागली.बुधवारी दुपारी बारागावपिंप्री येथून आगीच्या घटनांची मालिका सरू झाली. येथील गोराडे वस्ती रस्त्यालगत असलेल्या शेतात ठेवलेली चार ट्रॅक्टर वैरण व अडीच ट्रॅक्टर पोळ कांदा आगीच्या कचाट्यात सापडला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेचा अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला. याशिवाय माळेगाव एमआयडीसीचा एक अग्निशामक बंब व दोन खासगी टॅँकरच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नांनी आग विझविण्यात आली. रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने विडी-सिगारेट पेटवून फेकलेल्या काडीमुळे आग लागली असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.दुसरी घटना माळेगाव औद्योगिक वसाहतीतील सी-३१ या ब्लॉकमध्ये घडली. कंपनीतील केमिकलने अचानक पेट घेतल्याने आग लागली. तथापि, एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाने फोमच्या मदतीने आग तत्काळ विझविण्यात यश मिळवले. सिन्नर नगरपालिकेसह माळेगाव एमआयडीसीचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत अर्धीअधिक इमारत जळून खाक झाली होती. या आगीमुळे घराचे सागवानी लाकूड व इतर चीजवस्तू मिळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. गायकवाड यांच्या घरातील आग विझवून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला न् सोडला तोच दापूर रोडवरीलच नितीन दिलीप शिंदे यांच्या बंद घरास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सिन्नर नगरपालिका व माळेगाव एमआयडीसीचे आधीच मनेगाव येथे दाखल असलेले बंब रिकामे झाले होते. त्यामुळे आमदार राजाभाऊ वाजे यांनी रतन इंडिया कंपनीशी संपर्क साधून तेथील अग्निशमन बंब बोलावला. या बंबाने १० मिनिटांत आग विझवली. तोपर्यंत टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप, कपाट व कपाटातील रोख ४० हजार रुपये, कपडे, धान्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.मनेगाव शिवारात शिंदे यांच्या घराची आग विझविण्याचे काम सुरू असतानाच सिन्नर-घोटी मार्गावरील घोरवड घाटात मालवाहू ट्रकने पेट घेतल्याची व गायकवाड यांच्या घराची आग पुन्हा भडकल्याची खबर मिळाली. आमदार वाजे यांनी रतन इंडिया कंपनीचा बंब गायकवाड यांच्या घराकडे पाठविला, तर सिन्नर पालिकेचा बंब घोरवड घाटात पाठविला. महिंद्रा कंपनीचे मशीन इगतपुरी येथे घेऊन जाणाऱ्या ट्रकने घोरवड घाटाच्या चढावर पेट घेतला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने ट्रकची आग विझविली. तोपर्यंत भगूर पालिकेचाही बंब घटनास्थळी दाखल झाला होता. त्यांनी लगेच कूलिंग आॅपरेशन राबविले. सिन्नर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक रस्त्यातून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. (वार्ताहर)
सिन्नर तालुक्यात अग्नितांडव
By admin | Published: April 21, 2017 1:01 AM