कृषिमंत्री भुसे यावेळी म्हणाले, या कराराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळ्या विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेचा कृषी विभाग तांत्रिक सहकार्य करणार आहे. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषी विभागाची क्षमताबांधणी करण्यात येईल. कृषी, पणन, बाजार माहिती आदी बाबींमध्ये क्षमताबांधणीसाठी काम केले जाईल, असेही भुसे यांनी सांगितले. राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमेरिकेच्या वाणिज्यदूतातील कृषी तज्ज्ञ लॅझारो सँडवाल, ध्रुव सूद, श्रीमती सुमेधा रायकर-म्हात्रे, कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, सहसचिव श्रीकांत आंडगे आदींची उपस्थिती होती.
इन्फो
सरकारसोबतचा पहिला करार
अमेरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ म्हणाले की, सामंजस्य करार हा महत्त्वाकांक्षी असून, अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकारसोबतचा पहिला करार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या माध्यमातून द्विपक्षीय क्षमताबांधणी करण्यात येईल. अमेरिकेचे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान असून, जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस, तसेच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरीत्या काम करण्यास फार मोठा वाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फोटो- १६ दादा भुसे कृषी
पिकांची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करारप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आदी.
===Photopath===
160621\16nsk_27_16062021_13.jpg
===Caption===
फोटो- १६ दादा भुसे कृषि पिकांची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करारप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे, कृषीराज्य मंत्री विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आदी.