लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बलात्काराचा गुन्हा दाखल करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पिठाच्या विश्वस्तांकडून खंडणी मागणाऱ्या विभागातील कृषी सहायक महिलेस १० लाख रुपये घेताना तिच्या मुलासह पोलिसांनी शनिवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले.
सारिका सोनवणे आणि मोहित सोनवणे अशी आरोपींची नावे असून तिने आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले. सोनवणे यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी ५ लाख रु. लुटल्याची फिर्याद श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचे विश्वस्त निंबा शिरसाट यांनी दिली.
काय आहे नेमके प्रकरण?
सारिका व शिरसाट यांची २०१४ मध्ये ओळख झाली होती. दोघेही देवळा तालुक्यातीलच रहिवासी आहेत. संबंधित महिलेने आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण अशी कारणे सांगून २०१९ मध्ये प्रथम २५ लाख रुपये शिरसाट यांच्याकडून घेतले जानेवारी २०२३ मध्ये महिलेने फिर्यादी शिरसाट यांना भेटून मोबाइलमधील काही व्हिडीओ दाखविले व पुन्हा २० कोटी रुपयांची मागणी करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
बदनामीला घाबरून ५० लाख रुपये महिलेस देण्यातही आले. त्यानंतरही तिने १० कोटी ५० लाखांची मागणी केली. तेव्हा मात्र निंबा शिरसाट यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
१० लाखांसह लॅपटॉप जप्तसंशयित आरोपी महिलेच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. यात १० लाख रुपये रोख, एक लॅपटॉप, तीन ॲपल मोबाइल, काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.
स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचीही फसवणूक
n२०१८-१९ मध्ये सारिका यांनी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडूनही लाखो रुपये जमा केले.
nपरंतु, मुदत संपूनही पैसै परत केले नाहीत. त्यावेळेस निंबा शिरसाट यांनी सेवेकऱ्यांचे पैसे परत करण्यासाठी सारिका यांना २० लाखांची मदत केली.
nजानेवारी २०२२ मध्ये संशयित सारिका व तिच्या मुलाने शिरसाट यांना गंगापूर रोडला बोलविले. पैसे न दिल्यास मॉर्फ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
सारिका सोनवणे वैद्यकीय रजेवरसारिका सोनवणे या पिंप्री (ता. निफाड) येथे तालुका बीजगुणन केंद्रात कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. ४ ऑक्टोबरपासून त्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती उप विभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी दिली.