मालेगाव: राज्यातील शेतकऱ्यांना शेतात पिकवले ते विकण्यासाठी मालेगावी ६५० एकरावर कृषी महाविद्यालये साकारणार असून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू आहे. यातील पहिलाच प्रकल्प तालुक्यातील काष्टी येथे साकारणार आहे.
राहुरी येथील कृ्ृषी विद्यापीठातील समितीने मंगळवारी काष्टी भागात भेट देऊन पाहणी केली. समितीत कृषी विज्ञान विभागाचे प्रमुख डॅा. आनंद सोळंके, डॅा. दादाभाऊ यादव, डॅा. डी.डी.पवार, डॅा. मिलिंद डोके डॅा. रवी आंधळे, सचिन हिरे यांचा समावेश होता.
समितीने कॅम्पातील मोची कॉनर भागात असलेल्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास भेट दिली. महाविद्यालयात प्रथम वर्षात आलेल्या अडचणी आणि समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल येथे भेट देऊन तेथे उपलब्ध असलेले पाणी, जागेची पाहणी केली. तेथे एकाच जागेवर कृषी विज्ञान संकुलात पाच महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यात कृषी तंत्र विद्यालय (पॉलिटेक्निक), कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय ६५० एकरावर साकारणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७६ पदांना विद्यापीठाकडून मंजुरी देण्यात आली आहे. गरजेनुसार पदभरती केली जाणार आहे. सुमारे ४० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आहे. राज्यात एकाच छताखाली सर्व कृषी महाविद्यालये केवळ मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे होत असून हा शासनाचा पहिलाच प्रयोग आहे.