नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यातर्फे गोल्फ क्लब मैदानावर गुरुवारी (दि. ०७) नाशिक ‘जिल्हा कृषी महोत्सव २०१९’ दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद कृषी समिती सभापती तथा उपाध्यक्ष नयना गावित, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताणे, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, आत्माचे उपसंचालक कैलास शिरसाठ, आत्माचे सेवानिवृत्त प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाºयांनी उपस्थित शेतकºयांना जिल्ह्णातील दुष्काळावर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा योग्य व नियोजन बद्ध वापर करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे गटशेतीला व शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून शेतकºयांनी एकत्रित येऊन विक्री कौशल्य व विपणन ज्ञान आत्मसात करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला, तर कृषी क्षेत्रातील महिलांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नयना गावित यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक संजीव फडवळ यांनी केले. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी के ले. दिलीप देवरे यांनी आभार मानले.शेतकरी प्रबोधनावर भरशेतकºयांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळावी तसेच बाजार व्यवस्थेचे ज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पाच दिवस या प्रदर्शनाच्या आहे. या प्रदर्शनातून धान्य महोत्सवासह, सेंद्रिय शेतीमाल विक्री, परिसंवाद व चर्चासत्र, विक्रेता खरेदीदार संमेलन, शेतकरी सन्मान यासह खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.
जलव्यवस्थापनातून कृषिविकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 1:02 AM
नाशिक : शेतीसाठी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, शेतकऱ्यांनी ‘एव्हरी ड्रॉप, डेव्हलप क्रॉप’हे सूत्र वापरून जलव्यवस्थापन करून कृषी विकास साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी केले.
ठळक मुद्देराधाकृष्णन : नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन