ठळक मुद्देफायदेशीर किटकांविषयी शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
ताहाराबाद : नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र म व चर्चासत्र अंतापूर येथे आयोजित करण्यात आले होते. शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन व व इतर फायदेशीर किटकांविषयी शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कृषिदूत चारु दत्त गवळीप प्राचार्य ए. पी. चव्हाण, कार्यक्र म समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते, डॉ. के. के. सूर्यवंशी, प्रा. डी. एम. शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.