नाशिक : कृषी विज्ञान केंद्रांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रात रविवारपासून (दि.२३) तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद््घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इम्फाळच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी, हैदराबाद येथील कृषी तंत्रज्ञान अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद आणि कृषी तंत्रज्ञान अनुसंधान संस्थेचे (पुणे) संचालक डॉ. लखन सिंग यांची उपस्थित राहणार आहेत.
मुक्त विद्यापीठात कृषी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:04 AM