मानोरी : येवला तालुक्यात यंदा मका पिकावर लष्करी अळीने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने शेतकरी खरीप हंगामातील पहिल्याच पिकाची अवस्था बिकट झाली आहे.कृषी विभाग नाशिक यांच्याकडून सातारे येथील मक्यावर लष्करी अळी झा शेतात जाऊन पाहनी केली तसेच शेतकऱ्यांना योग्य त्या औषधांची फवारणी करून जनजागृती केली. कृषी विभागाकडून या आळीवर नियंत्रण घालण्यासाठी शेतकरी बांधवांच्या सातत्याने आटापिटा सुरु असतांना कृषी विभागाने पाऊल उचलून या परिसरात वाड्या-वस्तीत, शिवावर बैठका घेऊन लष्करी अळीवर नियंत्रण घालण्यासाठी अनेक उपयोजनाचे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले.शेतकरी बांधवांनाच्या शेतात जाऊन लष्करी अळीचा प्रादुर्भावाची पाहणी करून कृषी विभाग येवला यांच्या वतीने चर्चाचत्र घेऊन मार्गदर्शन करून याविषयांवर प्रयोग करून दाखविण्यात आले.यावेळी कृषी सहाय्यक साईनाथ कालेकर यांनी औषधांची फवारणी करून दाखवली. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी निफाडचे वाघ, तालुका कृषी अधिकारी नवले, मंडळ कृषी अधिकारी गायके, क्षीरसागर, जवणे, नाईकवाडे, कृषी सहाय्यक दीपक ढोकळे, माऊली गचाले, आप्पा पठारे, सागर पठारे, रामकृष्ण मखरे, अशोक दखने, जनार्दन पठारे आदी उपस्थित होते.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांकडे कृषी विभागाची भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 7:07 PM
मानोरी : येवला तालुक्यात यंदा मका पिकावर लष्करी अळीने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान घातल्याने शेतकरी खरीप हंगामातील पहिल्याच पिकाची अवस्था बिकट झाली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना योग्य त्या औषधांची फवारणी करून जनजागृती केली