मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.मालेगाव शहरासाठी बायपास असणारा सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर,मोखाडा, जव्हार विक्रमगड,मणारे,पालघर हा राष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची होईल.अशी विनंती भुसे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी याना केली. याशिवाय कोठारे, सटाणा मालेगाव चाळीसगाव राज्य महामार्ग १९ चे चौपदरीकरण ही लवकर पूर्ण केल्यास नाशिक जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी विनंती केली असता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करून प्रश्न सोडविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल(८०:११०) यांचा समावेश पीक विमा योजनेत करावा अशी मागणी कृषिमंत्री भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचेकडे मंगळवारी केली तोमर यांची भेट घेऊन त्यांना बीड मॉडेल ची माहिती दिली. या मॉडेल मध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा अधिक विचार केला गेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत याचा समावेश झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशा मागणीचे निवेदन तोमर याना दिले. याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि योजनांवर चर्चा केली.
कृषिमंत्री दादा भुसे यांचे केंद्रीयमंत्री गडकरींना महामार्ग कामाचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 12:40 AM
मालेगाव: राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आ ज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेऊन मालेगावसाठी राष्ट्रीय महामार्ग१६० आणि राज्य महामार्ग १९ अशा दोन मागण्या केल्या.
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग १६० चे काम लवकर पूर्ण केल्यास नाशिक आणि मुंबईसाठी रहदारी अधिक सोयीची