आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२१) पासून पेठ तालुक्यात कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी दिली.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या आवाहनानुसार २१ जून ते १ जुलैदरम्यान कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत प्रत्येक
कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषी
विद्यापीठाच्या संशोधित व अद्ययावत
तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देणार
आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळबागांची लागवड करावी, तसेच पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोहिमेत शेतकऱ्यांच्या यशोगाथाही दाखविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी
संजीवनी मोहिमेत सहभागी व्हावे,
असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी केले आहे.