दिंडोरी : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, दिंडोरीतर्फे मंगळवारपासून (दि. ९) विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. हे आंदोलन विविध टप्प्यात करण्यात येणार आहे.नायब तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्यासंदर्भात संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे कृषी सहायक संवर्गात नैराश्य निर्माण झाले आहे. कृषी सहायकांच्या समस्या सोडवण्यासाठी व मागण्या मान्य करण्यासाठी त्वरित बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन कृषी सहायक संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार लचके व दिंडोरी कृषी अधिकारी विलास सोनवणे यांना देण्यात आले आहे. यावेळी कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गोलाईत, जिल्हा प्रतिनिधी एस. एस. ठोकळे, उपाध्यक्ष एस. जी. बोंडे, सचिव एन. एम. पवार, कृषी सहायक जे. आर. क्षीरसागर, ए. डी. ननावरे, पंकज माळी, पी. एस. देशमुख, आर. एल. बैरागी, पन्हाळे, खेताडे, पगार, गायकवाड, मुसमाडे, पवार आदि कृषी सहायक उपस्थित होते. (वार्ताहर)
दिंडोरीत कृषी सहायकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 10:59 PM