नाशिक- हिंदु नववर्षाचा प्रथम दिवस म्हणजेच गुढी पाडवा! साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूत असलेल्या या सणावर मात्र कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे आज शहरातील अनेक भागात सार्वजनिक गुढ्यांवर मास्क लावून कोरोना ससंर्ग टाळण्याचा संदेश देण्यात आला आहे.
नाशिक मध्ये दरवर्षी गुढी पाडवा उत्साहात साजरा केल जातो. त्या निमित्ताने नाशिक शहरातील बाजार पेठांमध्ये प्रचंंड गर्दी असते. मात्र यंदा कोरोनमुळे देशपातळीवर लॉक डाऊन असल्याने नेहेमीसारखा उत्साह जाणवत नाही. घराघरांवर सकाळी सुमुहूर्त साधून गुढ्या उभारण्यात आला आहे. शुभेच्छांसाठी सोशल मिडीयाचा वापर करण्यात आहे. दरवषी शहराच्या विविध भागातून २१ नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. मात्र, त्या देखील यंदा कोरोमुळे अगोदरच रद्द करण्यात आल्या आहेत.
शहरात दरवर्षी काही सार्वजनिक मंडळे चौकात सार्वजनिक ठिकाणी गुढी उभारतात. मात्र, यंदा अशा गुढ्या उभारताना यंदा सामाजिक भान जोपासण्यात आला आहे. श्रीमंती श्री साक्षी गणेश मंदिरासह अनेक ठिकाणी चक्क गुढ्यांना मास्क लावण्यात आले आहे त्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.