नाशिक : येथील यश फाउंडेशन आणि एलव्हीएच महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रास युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एचआयव्ही, एड्सचा युवकांवरील प्रभाव हा चर्चासत्राचा विषय होता. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत एचआयव्ही, एड्स प्रबोधनाचा संदेश या युवकांद्वारा पोहचावा याकरिता एस.व्ही.के.टी. महविद्यालय, देवळाली कॅम्प येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय मेधने, उपप्राचार्य सैद पाटील, सुनीता आडके, प्रकाश पगारे, लीला जाधव आदी उपस्थित होते. एचआयव्ही, एड्सचा समाज व युवकांवरील प्रभाव या विषयावर योगेश परदेशी, युवकांपर्यंत पोहचवण्यामागे प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर प्रवीण बिडवे, समाजाप्रती कंपनीची सामाजिक जबाबदारी या विषयावर नामदेव येलमामे, प्रतिबंधाकरिता संस्थेची भूमिका या विषयावर रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन आव्हाड यांनी केले. राजेंद्र आहेर यांनी आभार मानले.
यश फाउंडेशनच्या वतीने एड्सविषयक चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:31 AM