पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत दोन हेक्टर परिसर खाक झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. अहिवंतवाडी हे अहिवंतवाडी वांजूळपाडा, पवारणीचा पाडा व कोल्हेर गावानजीकच्या जंगलात अचानक आग लागली. तेव्हा वनविभागाने रात्रीची गस्त घालणारे वनक्षेत्रपाल वसंत पाटील व कर्मचारी फिरते पथक यांनी ती लागलेली आग पाहिल्यानंतर चौसाळा परिमंडळ अधिकारी एम.डी. बोरसे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर सदर अधिकारी व कर्मचारीतत्काळ घटनास्थळी रवाना झाले व आग लागलेल्या क्षेत्राची पहाणी केली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने लागलेला वणवा त्यांना विझवण्यात यश आले; परंतु ज्याच्या ताब्यात वनक्षेत्र आहे ते अधिकार व कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने त्यांना आग लागलेला वनाचे काय सुख-दु:ख असे परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी राखीव जंगलाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:18 AM