शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

By अझहर शेख | Published: November 13, 2023 5:57 PM

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम.

नाशिक : शहरात लक्ष्मीपूजनाला नाशिककरांनी फटाक्यांचा जमके ‘बार’ केला. यामुळे वातावरणातील हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर समाधानकारक नाशिकच्या हवेचा स्तर अचानकपणे रविवारी (दि.१२) ढासळला. नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम झाल्याने वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचले. प्रदूषण पातळी २५६पर्यंत गेल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली.

अल्हाददायक वातावरणाचे शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची हवा धनत्रयोदशीपासून बिघडण्यास सुरुवात झाली. दिवाळीची धामधूम धनत्रयोदशीपासून सुरू झाली. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.११) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११८ इतका होता; मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री रविवारी यामध्ये कमालीची वाढ झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपासूनच शहर व परिसरासह उपनगरांमध्ये फटाक्यांची जोरदार आतषबाजीला प्रारंभ झाला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत फटाक्यांचा आवाज कानी येत होता. यामुळे हवेचा गुणवत्ता निर्देशांक रविवारी रात्री २०३पर्यंत वाढला होता. ध्वनीप्रदूषणाची पातळी जरी कमी राहिली असली तरी फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली. यामुळे नाशिकची हवा बिघडली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशेच्या पुढे सरकल्यामुळे प्रदूषणाचा धोकादायक स्तर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण मंडळाकडून (सीपीसीबी)करण्यात आली आहे

पहाटे वातावरणात वाढले धुरकेसोमवारी पहाटे प्रदूषणाची पातळी वातावरणात दिसून आली. हवेत पांढऱ्या धुरक्यांचा थर मोठ्या प्रमाणात साचलेला होता. रविवारी रात्री शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. याचा परिणाम सोमवारी सकाळी पाहावयास मिळाला. पांढरे धुरके वातावरणात मोठ्या प्रमाणात मिसळले होते.

‘ग्रीन दिवाळी’चा पडला विसरनाशिक शहरात प्रदूषणमुक्त किंवा ग्रीन दिवाळी यंदा साजरी होऊ शकली नाही. शासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेल्या आवाहनाला नाशिककरांकडून हरताळ फासला गेला. राज्यात मुंबई, पुणेसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण कमालीचे वाढल्याने दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडू नका, ग्रीन दीपावली साजरी करा, असे आवाहन केले जात होते; मात्र या आवाहनाला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही.

जीव गुदमरायला झाला...लक्ष्मीपूजनाच्या रात्री नाशिक शहर व उपनगरांमधून फेरफटका मारताना वातावरणात पसरलेला धूर व दुर्गंधीमुळे नागरिकांचा जीव गुदमरायला झाला होता. दम्याचे विकार असलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास जाणवला. तसेच, सामान्य नागरिकांनासुद्धा श्वासोच्छ्वास करताना अडथळा निर्माण होत असल्याचा अनुभव आला.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी 2023fire crackerफटाकेpollutionप्रदूषण