शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

आंतरजातीय विवाह करण्यासाठी हवा हरियाणा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:03 AM

कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह झाला तर त्यामुळे होणारे आॅनरकिलिंगचे प्रकार  बघता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने हरियाणा पॅटर्न राबवावा, असा प्रस्ताव महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला दिला आहे.

नाशिक : कुटुंबाच्या विरोधात जाऊन विवाह झाला तर त्यामुळे होणारे आॅनरकिलिंगचे प्रकार  बघता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने हरियाणा पॅटर्न राबवावा, असा प्रस्ताव महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शासनाला दिला आहे. मराठवाड्यातील बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी अलीकडेच झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा समितीने याच विषयाकडे लक्ष वेधले आहे.महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळेच राज्यात जादूटोणाविरोधी कायदा झाला आहे. त्यानंतर २०१३ मध्ये जातीबाहेर लग्न केल्याने जात पंचायतीच्या बहिष्कारामुळे एका महिलेची तिच्या पित्यानेच हत्या केल्याचे प्रकरण नाशिकमध्ये उघड झाले होते. त्यामुळे जात पंचायतीच्या विरुद्धात जात पंचायत मूठमाती अभियानदेखील हाती घेतले आहे. परक्या जातीत विवाह केला म्हणून जात पंचायतीचा रोष येतोच, परंतु ज्या कुटुंबाचा विरोध आहे १अशाप्रकारचे कुटुंबदेखील वैमनस्यातून हत्याकांडापर्यंत पोहचात. आॅनरकिलिंग हा नेहमीच होणारा प्रकार आहे. अलीकडेच बीड येथे बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बालाजी लांडे यांने रोहित वाघमारे याची हत्या केल्याचा आरोप असून हे प्रकरण गाजते आहे. त्यापार्श्वभूमीवर हरियाणा पॅटर्न राबविण्याची मागणी अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.२ आंतरजातीय विवाह करणाºयांना हरियाणात संरक्षण असून, पोलीस मुख्यालयात शेल्टर होम उभारण्यात आले आहे. तेथे अशाप्रकारे विवाह करणाºयांना दोन महिने राहता येते. दरम्यान पोलीस खात्याच्या वतीने विरोध करणाºया कुटुंबांचे कौन्सिलिंग केले जाते. संबंधितांच्या जीविताला काही झाल्यास जबाबदार धरू, असे स्पष्ट करण्यात येते त्यामुळे तणाव टळतात.३ यामुळेच अशाप्रकारचे शेल्टर होम राज्यात उभारावे असा प्रस्ताव राज्य शासनाला २०१७ मध्येच देण्यात आला असून, बीड प्रकरणानंतर आता त्याचा पुन्हा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती चांदगुडे यांनी दिली.हरियाणातील शेल्टर होममुळे आंतरजातीय किंवा विरोध पत्करून विवाह करणाºयांना नंतर संघर्ष करावा लागत नाही. हे प्रत्यक्ष समितीने बघितले असल्यामुळे महाराष्टÑातदेखील अशाप्रकारचे शेल्टर होम उभारले पाहिजे. त्याचबरोबर सध्या आंतरजातीय विवाह करणाºयांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ते कमी असून राजस्थानच्या धर्तीवर २ लाख रुपये मिळावेत, अशीदेखील समितीने यापूर्वीच मागणी केली आहे.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह,महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Nashikनाशिक