नाशिक : गेल्या मार्च महिन्यांपासून बंद पडलेली नाशिक शहराला अन्य शहर आणि राज्याला जोडणारी विमानसेवा येत्या १ जूनपासून पूर्ववत सुरू होणार असून, त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या सेवेसाठी शुक्रवारपासून (दि.२२) तिकीट बुकिंग सुरू झाले.नाशिकहून पुणे तसेच नाशिकहून अहमदाबाद आणि हैदराबादसाठी ही सेवा सुरू होत आहे. त्यासाठी आता ओझर येथील विमानतळावर लगबग वाढली आहे. केंद्रशासनाच्या दिलेल्या सूचनांचे पालन करीत ही सेवा सुरू होणार आहे. नाशिकच्या विमानसेवेचा इतिहास फार चांगला नसला तरी गेल्या काही वर्षांत व्यापारी उद्योजकांची मागणी आणि नाशिकचे स्थान महात्म याला केंद्र शासनाची जोड मिळाली.केंद्र सरकारने सर्व धावपट्यांचे लिलाव करून उडान योजने अंतर्गत अंतर शहर आणि आंतर राज्य विमानसेवा सुरू करण्यास प्रोत्साहित केले. ५० टक्के प्रवासी तिकिटांना अनुदानदेखील दिले. नाशिकची विमानसेवा म्हटली की, नाशिक-मुंबई हे समीकरण मुंबई-आग्रा महामार्ग चौपदरीकरणाने बदलविले. त्यामुळे मुंबईपेक्षा अन्य शहरांना जोडणारी सेवा अधिक अनुकूल ठरली. अगदी दिल्ली सेवेसाठी बोइंग विमान दिवसाआड सुरू असतानादेखील त्याला प्रतिसाद मिळाला. १६० आसनी या बोर्इंग विमानाला कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी शंका होती. मात्र, ही सेवा अत्यंत जोमान सुरू होती.दुर्दैवाने कंपनीच्या अन्य अडचणीमुळे ही सेवा स्थगित असली तरी नाशिक-हैदराबाद, नाशिक-अहमदाबाद या सेवा अंतर राज्यातील शहरांना जोडणाऱ्या सेवा सुरू आहेत, तर नाशिक-पुणे ही सेवादेखील सुरू आहे. अहमदाबाद विमानसेवेला इतर इतका चांगला प्रतिसाद मिळाला की दोन कंपन्या ही सेवा देत आहेत.---कार्गो सेवा सुरू होण्याची चिन्हेदेशांतर्गत विमानसेवा बंद असली तरी मालवाहतूक म्हणजेच कार्गो सेवा सुरू होती. ओझर येथील विमानतळावरून काही वेळा औषधे-किट अन्यत्र पाठविण्यात आले आहे. मात्र, नाशिकहून मुंबईमार्गे अन्यत्र माल पाठविण्याची सेवा मात्र स्थगित होती. देशांतर्गत सेवेपाठोपाठ आंतर राष्ट्रीय विमानसेवेला चालना मिळल्यानंतर नाशिकमधून ही सेवा सुरू होऊ शकेल.
विमानसेवेचे सोमवारपासून उडाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:08 PM