शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

विमानसेवेचे १५ एप्रिलपासून पुन्हा ‘उडान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 1:13 AM

नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पायलटची अडचण भासत असून, ते उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, नाशिकहून दुपारी मुंबईला जाण्याचे सध्याचे शेड्युल्ड रद्द करण्यात आले असून, आता ही सेवा पूर्वीप्रमाणेच सकाळी ६ वाजता असणार आहे.

ठळक मुद्देएअर डेक्कन :दुपारऐवजी आता पुन्हा सकाळीच उड्डाण१५ एप्रिलपासून पुढेही तरीही बुकिंग नाहीच..

नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पायलटची अडचण भासत असून, ते उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, नाशिकहून दुपारी मुंबईला जाण्याचे सध्याचे शेड्युल्ड रद्द करण्यात आले असून, आता ही सेवा पूर्वीप्रमाणेच सकाळी ६ वाजता असणार आहे.नाशिकला एकदा विमानसेवा सुरू झाली की मागे वळायची गरज भासणार नाही, असे सेवेचा आग्रह धरणाऱ्या अनेक व्यावसायिक संघटना आणि लोकप्रतिनिधींचा एअर डेक्कनच्या अनियमित सेवेमुळे मुखभंग झाला. ही सेवा आठ दिवसांसाठी म्हणजे २७ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बुधवारपासून (दि. २८) ही सेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सुरू झाली नाही. एअर डेक्कनच्या वेबसाइटवरून बुकिंगच घेतले जात नव्हते. तसेच सेवा कधी सुरू होणार याचा उल्लेख नव्हता. तरीही ही सेवा १५ तारखेला सुरू होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच दिले होते. ते अखेरीस खरे ठरले. ही सेवा १५ एप्रिलपासून सुरू होईल असे बुधवारी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. कंपनीने महाराष्टÑात मुंबई- कोल्हापूर तसेच पुणे-जळगाव अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे शेड्युल्डची पुनर्रचना करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पायलटची कमतरता, उपलब्ध झालेल्या पायलटचे प्रशिक्षण या सर्व बाबींसाठी कंपनीने दोन आठवड्यांसाठी ही सेवा स्थगित केली होती.आता ही सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होईल, असे गोडसे यांनी सांगितले. त्यामुळे सेवेविषयीची निर्माण झालेली अनिश्चितता तूर्तास संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर आता ही सेवा दुपारऐवजी पुन्हा सकाळचीच असणार आहे. ओझर विमानतळावरून सकाळी ६ वाजता मुंबईसाठी विमान उपलब्ध असेल.नाशिकमधून ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईत अचानक दुपारचा स्लॉट देण्यात आल्याने कंपनीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद घटला होता. अगदी २५ ते ३० टक्के प्रवासीच मिळत होते. याबाबत मी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सचिवांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुन्हा सकाळीच स्लॉट उपलब्ध करून दिला आहे.- हेमंत गोडसे, खासदार१५ एप्रिलपासून पुढेही तरीही बुकिंग नाहीच...एअर डेक्कन कंपनीची स्थगित सेवा १५ एप्रिल रोजी सुरू होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने जाहीर केले असले, तरी वेबसाइटवर मात्र यादिवशी सर्व तिकिटे सोल्ड आउट दाखवत असून, पुढील तारखांनाही विमानसेवा उपलब्ध नसल्याचे दाखवत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वेळापत्रक असे...नाशिकहून मुंबईकडे उड्डाण सकाळी ६ वाजता, मुंबईत पोहोचण्याची वेळ ६.५०.मुंबईहून उड्डाणाची वेळ सायंकाळी ४.५५, नाशिकमध्ये पोहोचण्याची वेळ ५.४५.नाशिकहून पुण्याकडे प्रस्थान ६ वाजता, पुण्यात पोहोचण्याची वेळ ६.४५.पुण्याहून नाशिककडे उड्डाण ७.०५ वाजता, नाशिकमध्ये पोहोचण्याची वेळ ७.४५.