शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
4
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
5
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
6
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
7
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
8
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
9
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
10
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
11
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
12
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
13
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
14
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
15
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
16
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
17
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
18
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
19
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

आकाशवाणी केंद्र : प्रस्तावित मंडईचे मध्यरात्री काम सुरू केल्याने संताप भाजीविक्रेत्यांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:02 AM

गंगापूररोड : जॉगिंग ट्रॅकजवळील भाजीबाजाराच्या जागेवर बिल्डरकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक खोदकाम व कंटेनरची संरक्षक भिंत तयार करून पोलादी कुंपण घालण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीविक्रे त्यांनी मंगळवारी (दि.१०) सकाळी आंदोलन उभे केले.

ठळक मुद्देबांधून घेत असलेली भाजी मंडईची जागा अपुरी भूखंड विकसित करण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव मंजूर

गंगापूररोड : आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकजवळील भाजीबाजाराच्या जागेवर बिल्डरकडून कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक खोदकाम व कंटेनरची संरक्षक भिंत तयार करून पोलादी कुंपण घालण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाजीविक्रे त्यांनी मंगळवारी (दि.१०) सकाळी आंदोलन उभे केले. मध्यरात्री या आरक्षित भूखंडाचा ताबा बिल्डरने घेतल्याच्या निषेधार्थ भाजीविक्रेत्यांनी थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या जागेवर महापालिका संबंधित जागा मालकाकडून एआरखाली बांधून घेत असलेली भाजी मंडईची जागा अपुरी असून त्याठिकाणी सध्या असलेल्या तीनशे ते साडेतीनशे विक्रेत्यांना जागा पुरणार नाही शिवाय पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार असल्याने महापालिकेने सर्व भाजीविक्रेते सामावतील अशा पध्दतीने बांधकाम करून देण्याची विक्रेत्यांची मागणी असून ते उपोेषणावर ठाम आहेत.मनपाच्या विकास आराखड्यात आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या भूखंडावर मैदान, व्यापारी संकुल व भाजी मार्केट आणि वाहनतळाचे आरक्षण आहे. समावेशक आरक्षण पध्दतीने जागा मालकाला हा भूखंड विकसित करण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु अद्याप ते विकसित होऊ शकलेला नाही. मंगळवारी मध्यरात्री रात्रीच्यावेळी कंटेनर उभे करून आत भाजी मंडईसाठी खोदकाम सुरू केल्याचे सकाळी उघड झाले आणि त्यामुळे सकाळी येथे भाजीविक्रे त्यांनी मोठी गर्दी केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समितीच्या अध्यक्ष व परिसराच्या नगरसेवक हिमगौरी आडके, विभागीय अधिकारी नितीन नेर, नगरसेवक स्वाती भामरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कंटेनर हटविण्याचे आदेश दिले जातील तसेच पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असे आश्वासन आडके यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिले. मात्र जोपर्यंत विकासक कंटेनर हटवित नाहीत तोपर्यंत कुठलीही चर्चा होणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने किशोर शिरसाट यांनी घेतली. त्यानंतर आकाशवाणी केंद्राजवळील बाजाराच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ही जागा मनपाने विकसित केली तर एसटी कॉलनी येथील ५४ टपरीधारकांसह भाजी व्यावसायिक, शेतकरी व बेरोजगार तरु णांचे पुनर्वसन होऊ शकते. तसेच जुन्या ए.आर.नुसार विकसनाच्या मोबदल्यात २० टक्के जागा उपलब्ध होणार होती मात्र नवीन ए.आर.नुसार ४० टक्के जागा उपलब्ध होत असल्याचा मुद्दा यावेळी शिरसाठ यांनी उपस्थित केला. यावेळी प्रवीण बोरसे, अजय घोरपडे, संतोष धोंडगे, कुंदन भदाणे, गोरख नाईकवाडी, मोहन गवारे आदींसह आंदोलनकर्ते उपस्थित होते.