येथील मराठा दरबार सभागृहात आयोजित उद्योजक संमेलनात कृषिमंत्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापन सचिन भामरे, औद्योगिक विकास महामंडळाचे शेख, उद्योजक विजय लोढा, रमेश जाजू, कैलास मेहता, ओम गगराणी यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
यंत्रमाग व्यवसायासाठी मालेगावचे नाव संपूर्ण जगात अधोरेखित झाले आहे. या व्यवसायाला अजंग एमआयडीसीच्या माध्यमातून आधुनिकतेची जोड मिळणार आहे. अजंग येथील या प्रकल्पात फूड पार्कसाठी ९६ प्लॉट, प्लास्टिक पार्कसाठी २७४ प्लॉट तर टेक्सटाइल पार्कसाठी ४६ प्लॉटचे आरक्षण करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त लहान- मोठ्या उद्योजकांसाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल. रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. ॲग्रो प्रोसेसिंगचा समावेश असल्याने कृषी उद्योगांनाही चालना मिळणार आहे.
इन्फो
प्लॉटचे दर ६०० रुपये चौरस मीटर
प्रकल्पासाठी तालुक्यातील उद्योजकांना प्राधान्यक्रम ठरविण्यात आल्याचे सांगून सर्वांना परवडतील असे दर कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ३० जून २०२१ पर्यंत प्लॉटचे दर हे ६०० रुपये प्रति चौरस मीटर तर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ७९० रुपये प्रति चौ. मी. व १ जानेवारी २०२२ नंतर १५८० प्रति चौरस मीटर असे दर आकारण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
इन्फो
तज्ज्ञांच्या समितीची सूचना
तालुक्यातील उद्योजकांनी एकत्र येऊन तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठित करण्याची सूचना करण्यात आली. शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध याेजनांचा लाभ मिळवून देण्याचे कृषिमंत्री भुसे यांनी आश्वासन दिले. महिला उद्योजकांना सबसिडीमध्ये अधिकचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे सतीश भामरे यांनी अजंग- रावळगाव प्रकल्पाची माहिती दिली.
===Photopath===
050221\05nsk_50_05022021_13.jpg
===Caption===
मालेगावी मराठा दरबारमध्ये आयोजित उद्योजक संमेलनात मार्गदर्शन करताना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे. समवेत सचिन भामरे, शेख, विजय लोढा, रमेश जाजू, कैलास मेहता, ओम गगराणी आदि.