नाशिक : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) अटक करण्यात आलेले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याच्या रामवाडीमधील घराची पोलिसांनी झडती घेतली.हनुमानवाडी कॉर्नरवर दोन ते अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या खूनप्रकरणातील मोक्काचे संशयित आरोपी करण रवींद्र परदेशी (२०), कुंदन सुरेश परदेशी (२४) (दोन्ही रा. दळवी चाळ), अजय जेठा बोरीसा (२५) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित आरोपींचा सध्या मध्यवर्ती कारागृहात मुक्काम आहे. या गुन्हेगारांना आर्थिक मदत करणे, आश्रय देणे व राजकीय वरदहस्त आदि गुन्हे असलेल्या श्रमिक वाहतूक सेना, कामगार सेना, हॉकर्स सेना यांसारख्या विविध संघटनांचे जिल्हाध्यक्षपद भूषविणारा संशयित बागुल याच्या मुसक्या २८ जुलै रोजी पोलिसांनी आवळल्या होत्या. न्यायालयाने बागुलला पोलीस कोठडी सुनावली असून, याप्रकरणी तपासासाठी सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण व पोलीस पथकाने बुधवारी (दि.३) संध्याकाळी रामवाडी येथील त्याच्या घराची झडती घेतली आहे. बागुल याला पोलिसांनी रामवाडी येथे आणून त्याच्या उपस्थितीत घरे पिंजून काढली, मात्र पोलिसांना फारसे काही आढळून आले नाही. (प्रतिनिधी) ं
अजय बागुलच्या घराची झडती
By admin | Published: August 05, 2016 2:19 AM