निफाड : तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याने नांदूरमध्यमेश्वर बंधाºयातील कॅनॉलच्या पाण्यात वाहून जाणाºया महिलेला वाचविल्याबद्दल त्याचा स्वातंत्र्यदिनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अजय बंडू वलंबे हा नांदूरमध्यमेश्वर परिसरात राहतो. अजय हा विद्यार्थी शिवरे येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयवा अकरावीला कला शाखेत शिकत आहे. मे महिन्यात अजय हा पोहण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर बंधाºयाच्या गोदावरी डाव्या कॅनॉल येथे गेला होता. त्यावेळेस नांदूरमध्यमेश्वर ते गाजरवाडी या दरम्यानच्या कॅनॉलच्या पुलावरून अंगणवाडी सेविका उषा पांडुरंग पगारे या जात असताना त्यांचा पाय घसरून त्या कॅनॉलच्या पाण्यात पडून वाहून जाऊ लागल्या. पगारे या जवळजवळ ५०० मीटर वाहून गेल्या असताना अजयने पाण्यात उडी घेऊन पगारे यांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले होते. त्याच्या या शौर्याबद्दल अजय याचा निफाड येथील तहसील कार्यालय येथील स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यानंतर आमदार अनिल कदम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अजय याच्या शौर्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी दिली. याप्रसंगी निफाडचे प्रांत महेश पाटील, पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, तहसीलदार दीपक पाटील आदी उपस्थित होते.
महिलेचा प्राण वाचविणाऱ्या अजयचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 6:54 PM