नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने गंगापूरोडवर गुरुवारी (दि. १) झालेल्या एका सामाजिक कार्यक्रमात हा प्रसंग घडला. अजित पवार तसे \वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. त्यातही पहाटेचा शपथविधी हा तितकाच स्मरणात राहणारा ठरला आहे. गुरुवारी (दि.१) कार्यक्रमात संयोजकांनी प्रत्येक प्रमुख अतिथींना \वेगवेगळ्या मूर्ती भेट दिल्या. यावेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी अजित पवार यांना नीलकृष्णाची, तर छगन भुजबळ व नरहरी झिरवाळ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. पवार यांना कृष्णमूर्ती दिल्याने अगोदरच उपस्थितीतांमध्ये खमंग चर्चा सुरू झाली होती. त्यात भुजबळ यांनी भर घातली. कोणत्या अतिथीला केाणती भेट द्यायची, हा संयोजकांचा प्रश्न असला तरी अजित पवार यांना कृष्णमूर्ती दिली आहे. अजित पवार हे कृष्णासारखेच आहेत. भगवान श्रीकृष्ण नटखट असला तरी तारणहार असतात, असे भुजबळ यांनी म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. कृष्णाप्रमाणेच ते संस्थेचे तारणहार ठरतील असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
अर्थात, पवार यांनीही त्यांना लगोलग उत्तर दिले. कृष्णाप्रमाणे असलो तरी मी नटखट नाही, मी तारणहार आहे, संस्थेने गोरगरिबांना शिक्षण द्यावे यासाठी त्यांना पाच कोटी रुपयांची मी मदत देत आहे, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
छायाचित्र आर फेाटोवर ०१ श्री कृष्ण नावाने सेव्ह...
010721\01nsk_39_01072021_13.jpg
अजित पवार कृष्णमूर्ती