- राजा मानेयेवला (नाशिक) : ईडीच्या संदर्भात शरद पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाने उच्च ‘टेंपो’ गाठला होता. अजित पवारांच्या राजीनाम्याने सगळा ‘फोकस’ दुसरीकडे वळला आणि शरद पवारांनी आंदोलनाने उभा केलेला जनमानसाचा ‘टेंपो’ खाली आला. अजित पवारांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नव्हती पण तो त्यांनी दिला, असे उद्विग्न उद्गार राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना काढले.छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघात त्यांची भेट घेतली.
सर्व विरोधक एकवटल्याने निवडणूक तुम्हाला जड चाललीय म्हणे!...अहो, सोप्पी म्हणा! उलट मला निवडणूक सोपी झालीय. कारण मतदारांना विकास आणि माझे काम कळते.पण राष्टÑवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रचारापासून तुम्ही अलिप्तच का दिसता?नाशिक जिल्ह्यावर सध्या मी लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाचे १५ उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागलो आहे. त्यामुळे राज्यात अजून फिरायला सुरुवात केलेली नाही. पण लवकरच करणार आहे.राष्टÑवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. तुम्हीदेखील निघाल्याची चर्चा होती. तुम्ही गेला नाहीत की त्यांनीच तुम्हाला घेतले नाही?ही सगळी चर्चा तुम्ही मीडियावाल्यांनी घडवून आणली. बाकी मी आहे तिथेच आहे!सुशीलकुमार शिंदेंसारखा ज्येष्ठ काँग्रेस नेता राष्टÑवादीचे काँगे्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे अशी भावना व्यक्त करतो, तुमची काय भावना?आज त्या विषयाला महत्त्व नाही. अजित पवारांचा राजीनामा असेल नाही तर हा विलनीकरणाचा विषय विरोधी पक्षाचा ‘फोकस’ बदलण्याचा प्रयत्न सतत काही मंडळी करताहेत!शरद पवारांसारखा नेता ‘वन मॅन आर्मी’ शैलीत राज्यभर फिरतोय. बाकी नेत्यांचे काय?नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघ असून त्यापैकी १० राष्ट्रवादीलाआणि पाच काँग्रेसला सुटलेले आहेत. १५ पैकी आघाडीचे किमान १२ आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. शेवटी आमदार निवडून आणणे महत्त्वाचे असून या १५ आमदारांचा आपण प्रचार करत आहे. तसेच १४ आॅक्टोबरला महाराष्ट्रातील कर्जत, वैजापूर या मतदार संघात जाणार आहे.शरद पवारांवर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला तर अजित पवारांनी राजीनामा दिला. तुम्ही संकटात असताना तुमच्या मदतीला पक्षाचे कोण आले?राष्टÑवादी काँग्रेस पक्ष माझ्या पाठीशी खंबीर उभा राहिला. शरद पवार आणि आम्ही सर्वजण पक्ष बांधणीसाठी सतत कार्यरत राहूच.राज ठाकरे प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडणूक द्या म्हणतात मग विरोधी पक्षाची राष्टÑवादीची संधी जाणारच म्हणायचं का?हो! राष्टÑवादीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधात बसायचा प्रश्नच नाही.आघाडी सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करणे ही चूक होती व ती एका ज्येष्ठ नेत्याच्या दबावामुळे घडली, असे अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले आहे. ते ज्येष्ठ नेते तुम्हीच तर नाही ना?खरं तर १९९९ मध्ये ज्यावेळी आम्ही पक्षाच्या प्रचारासाठी उतरलो, त्यावेळी आमच्या वचननाम्यातच श्रीकृष्ण आयोगाने ज्या लोकांना दोषी ठरवले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, असं होतं. १९९५ मध्ये जेव्हा युतीचं सरकार होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांविरुद्ध असलेल्या खटल्यांचा निपटारा करण्यात आला होता. परंतु, श्रीकृष्ण आयोगाची फाईल तशीच ठेवण्यात आली होती. ती फाईल माझ्यासमोर आली तेव्हा मी गृहमंत्री होतो. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी माझी देखील स्थिती झाली होती. त्यामुळे मला नाईलाजाने सही करावी लागली. मात्र हा मुद्दा आता संपला आहे.