बागलाण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या तुलनेत आरोग्य यंत्रणा सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे. यामुळे साहजिकच रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी तसेच अजमिर सौंदाणे येथे ४०० बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी आमदार दिलीप बोरसे यांनी प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑक्सिजनअभावी नामपूर कोविड रुग्णालय सुरू करता येत नसल्याची कैफियत अधिका-यांनी मांडली. यावेळी आमदार बोरसे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शल्यचिकित्सक अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधून तत्काळ नामपूर कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करून रुग्णालय रुग्णांसाठी खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, कर्मचा-यांची संख्या पाहता एकाच ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार अजमिर सौंदाणे येथे ४०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इन्फाे
ऑक्सिजनचे १७ अद्ययावत यंत्र
तालुक्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. बहुतांश रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक व तीन ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी दोन असे १७ ऑक्सिजन तयार करणारे अद्ययावत यंत्र येत्या दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. सध्या ही १७ स्वयंचलित यंत्र कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णासाठी ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
फोटो- १५ सटाणा कोविड
अजमिर सौंदाणे येथील काेविड सेंटरची पाहणी करताना आमदार दिलीप बाेरसे, समवेत अधिकारी.
===Photopath===
150421\15nsk_56_15042021_13.jpg
===Caption===
फोटो- १५ सटाणा कोविड अजमिर सौंदाणे येथील काेविड सेंटरची पाहणी करताना आमदार दिलीप बाेरसे. समवेत अधिकारी.