मालेगाव : शहरातील व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर टाकणाºया चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता येत्या १७ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामी कारक मजकूर व्हायरल करणाºयांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. सामाजिक शांततेला बाधा पोहचविणाºया विरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांना एका व्हॉटस्अप ग्रुपवर शिवीगाळ व आक्षेपार्ह विधाने वापरली गेली होती. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच व्यक्तीकडून वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे पोलिसांनी कायद्याचा दंडूका हातात घेतला आहे. गेल्या २७ डिसेंबर रोजी एका व्हॉटस्अप ग्रुपवर राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांबाबत रियाजअली युसुफअली, शेख अब्दूल्ला शेख महेमुद, आदिलखान इस्त्राईलखान, फईम अहमद रफीक अहमद यांनी बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर व्हॉटस्अपवर टाकला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकूरवाड यांच्या मार्गदशर््नाखाली पोलीस पथकाने चौघांना १२ जानेवारीला अटक केली आहे. या चौघांना १३ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. व्हॉटस्अप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकणाºयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवले यांनी दिली.
आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या चौघांना पाच दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 5:50 PM