नाशिक : तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या किमया महाजन या बालिकेने लिहिलेल्या ‘माय ओन लिटिल वर्ल्ड’ या गोष्टींच्या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.
या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी, नाशिकच्या किमयाने अगदी नावाप्रमाणे किमया करत थेट गोष्टी लिहिल्या आहेत. ही किमया म्हणजे ‘मॅजिक गर्ल’ असून, इतक्या लहान वयात कल्पनाशक्तीच्या जोरावर गोष्टी लिहून त्यामधून एक सकारात्मक संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. हे सारं काही तिच्यावर करण्यात आलेल्या संस्कारांचा मिलाफ असल्याचे त्यांनी सांगितले. माशेलकर यांनी सांगितले की, लहान वयात मोठी समज असणे हा खूप मोठा गुण आहे. मी पुस्तक वाचलं असून, त्यात मनोरंजन नसून प्रत्येक कथेत एक संदेश दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रियदर्शनी अकादमीचे नानक रूपाणी या मान्यवरांनी उपस्थिती लावत किमयाचे कौतुक केले.
तसेच तिचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असून, ती नक्की मोठी लेखिका बनेल असे त्यांनी सांगितले. अकरा विविध विषयांवरच्या कथा तिने लिहिल्या असून, या निमित्ताने किमया महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची इंग्रजी लेखिका ठरली असून, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तिची आई आर्किटेक्ट शीतल सोनवणे यांनी सांगितले.
फोटो
२४गडकरी