निफाड : रविवारी (दि.४) निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधून दुपारी ३ पासून १ लाख ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात आला.गेल्या ११ दिवसांपासून नांदूरमधमेश्वर बंधाºयातून विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांनी धरणाच्या भागात गर्दी केली होती. रविवारी निफाड तालुक्यात दुपारी ४ पर्यंत मुसळधार पावसाने झोडपले, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. दरम्यान, विविध धरणांतून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला महापूर आला आहे. गोदकाठच्या गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी रविवारी सायखेडा, चांदोरी येथे थांबून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी तातडीने निर्देश दिले. गोदावरी, बाणगंगा नद्यांना पूर आल्याने सायखेडा येथे ५००, चांदोरी येथे ३५०, ओझर येथे १५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात येऊन त्यांची व्यवस्था जि.प. शाळा, मंगल कार्यालय, माध्यमिक शाळा या ठिकाणी करण्यात आली आहे. चांदोरी येथे एनडीआरएफचे पथक दुपारी दाखल झाले आहे. निफाडला पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कडवा नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.चांदोरी येथे नाशिक औरंगाबाद रोडवर गोदावरी नदीच्या पुराचे पाणी आल्याने या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कोठुरे ते करंजगाव वाहतूक बंदगोदावरीला महापूर आल्याने रविवारी दुसºया दिवशीही कोठुरे ते करंजगाव या दरम्यानची वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतर बंद करण्यात आली होती. दिवसभर मुसळधार पावसाने झोडपल्याने तालुक्यातील नाले भरून वाहत होते. निफाडजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर आचोळ्या नाल्याचे पाणी शिरल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारी १ वाजेपासून ठप्प झाली होती. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.जिल्ह्यातील पश्चिम भागातील विविध धरणांतून पाणी सोडल्याने गोदावरीला महापूर आल्याने वाढलेले पुराचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात आल्यानंतर रविवारी सकाळपासून नांदूरमधमेश्वर बंधाºयाच्या आठ दरवाजांतून विसर्ग चालू होता. गोदावरीला महापूर आल्याने सकाळी १० वाजता हा विसर्ग १ लाख क्यूसेक करण्यात आला. दुपारी १ वाजता विसर्ग १ लाख ३० हजार क्यूसेक करण्यात आला. दुपारी २ वाजता विसर्ग १ लाख ५० हजार क्यूसेक करण्यात आला. पुराचे पाणी वाढत असल्याने दुपारी ३ वाजता विसर्ग १ लाख ८० हजार क्यूसेककरण्यात आला. रात्री आठ वाजता २ लाख ८० हजार २९७ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला़
गोदाकाठी सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 12:39 AM
निफाड : रविवारी (दि.४) निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधून दुपारी ३ पासून १ लाख ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात आला.
ठळक मुद्दे रविवारी निफाड तालुक्यात दुपारी ४ पर्यंत मुसळधार पावसाने झोडपले