नाशिक : भाजपा-सेना युती तुटल्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना टाळी देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत असली तरी राज ठाकरे यांनी अद्याप याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे रात्री नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते येथेच याविषयी काय घोषणा करतात का याकडे तमाम राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अनेक राजकीय भूमिका नाशिकमध्येच मांडल्या आहेत. नाशिकवरील त्यांचे विशेष प्रेम पाहता ते मोठा राजकीय निर्णय घेणार का? या विषयीची चर्चा दिवसभर सुरू होती. सायंकाळी त्यांचे हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आगमन झाले, मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नसली तरी सोमवारी सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत भाजपा नगरसेविका ज्योती गांगुर्डे आणि भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सोमनाथ बोडके यांनी मनसेत प्रवेश केला.
राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
By admin | Published: January 30, 2017 12:15 AM