नाशिक : काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अर्थात, यासंदर्भात यापूर्वी प्रयत्न करूनदेखील या विभागाने प्रतिसाद दिला नसल्याने आता पुन्हा राजकीय स्तरावर विशेषत: पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.महाड येथे सावित्री नदीवरील पुलावरून बस वाहून गेल्यानंतर शासकीय-निमशासकीय यंत्रणा जागा झाल्या आणि आपापल्या कार्यक्षेत्रातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सुरुवात झाली. नाशिक महापालिकेने यासंदर्भात तीन जुन्या पुलांचे आॅडिट करण्यासाठी एजन्सी नियुक्त केली, परंतु या एजन्सीने कोणत्याही प्रकारे काम केले नव्हते. ब्रिटिश कालीन होळकर पूल, आडगाव येथील जुना पूल आणि वालदेवी नदीवरील पूल अशा तीन पुलांचे आॅडिट करण्यासाठी काम देऊनही एजन्सीने काहीच कार्यवाही केली नसल्याचे ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शहर अभियंता संजय घुगे यांनी संबंधित एजन्सीची कानउघडणी केली होती. मात्र त्यानंतरदेखील एजन्सीने होळकर पुलाची साध्या डोळ्यांनी दिसणारी स्थिती अहवालात मांडली होती. शहर अभियंत्यांनी एजन्सीचा अहवाल नाकारून सविस्तर आॅडिट करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर एजन्सीने अहवाल दिलेला नाही.दरम्यान, आता महापालिकेने शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडूनच स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची तयारी केली आहे. या विभागाने होकार दिल्यास ज्या पुलांना तीस वर्षे झाली, त्या सर्वच पुलांचे आॅडिट करण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे. तथापि, संबंधित शासकीय विभागाने याबाबत कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नसल्याने लोकप्रतिनिधींना मध्यस्थ करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यामार्फतच प्रस्ताव मान्य करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.आडगावला पूल प्रस्तावितमहापालिकेने यापूर्वी तीन पुलांचे आॅडिट हाती घेतले होते. त्यापैकी होळकर पुलाला अगोदरच समांतर पूल तयार करण्यात आले आहेत. आडगाव येथील पुलाची दुरवस्था झाल्याने त्याठिकाणी पर्यायी पूलप्रस्तावित आहे. त्याला मंजुरीहीमिळाली आहे, तर वालदेवीनदीवरदेखील पर्यायी पूल बांधण्यातआला आहे.
शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:37 AM
काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अर्थात, यासंदर्भात यापूर्वी प्रयत्न करूनदेखील या विभागाने प्रतिसाद दिला नसल्याने आता पुन्हा राजकीय स्तरावर विशेषत: पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
ठळक मुद्देमहापालिकेचे प्रयत्न : शासनाच्या एजन्सीला साकडे