नाशिक : शहरातील वातावरण अचानक लहरी झाले असून, दिवसभर थंड वारे सुमारे ९ कि.मी प्रति तास वेगाने वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. वातावरणात गारठा कायम राहिल्याने शनिवारी (दि.९) नागरिक ांना दिवसभर बोचरी थंडी अनुभवयास आली.मागील चार ते पाच दिवसांपासून शहरात थंडीची लाट कायम आहे. या हंगामातील सर्वाधिक नीचांकी किमान तपमान ९.४ इतके गेल्या मंगळवारी नोंदविले गेले होते. तेव्हापासून थंडीची तीव्रता शहरात कायम आहे. शनिवारी किमान तपमान १०.६, तर कमाल तपमान २८ अंशांवरून थेट २६ अंशांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. शीतल वाऱ्याचा वेग सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९ कि.मी. प्रतितास कायम राहिल्याची नोंद नाशिकच्या हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. पुरेसा स्वच्छ सूर्यप्रकाश आकाशात काही प्रमाणात ढग दाटल्यामुळे पडला नाही. तसेच थंड वाºयाचा वेगही कायम राहिला. परिणामी वातावरणात शुक्रवारी रात्री १० वाजेपासून निर्माण झालेला गारठा शनिवारी रात्री उशिरापर्यंत कायमच होता. थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला होता. कारण त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशांपर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत खाली घसरले होते.
दिवसभर वाहिले थंड वारे; उन्हाची तीव्रता कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:34 AM