येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली. अपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान झाले असून केवळ इंजिन शिल्लक होते. गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा आटोपून औरंगाबादकडे व्हर्ना गाडीतून (क्र मांक एम.एच.-२०, ई ई.-७२८४) ने पाच जण परतत होते. वैजापूर कडून येवल्याच्या दिशेने ट्रक (क्र मांक एम.एच.१८ एम.३१९४) भरधाव वेगाने येतांना व्हर्ना गाडी खामगाव शिवारात मारुती ८०० कार (एमएच बीडब्ल्वू ५१७८) ला ओव्हरटेक करतांना, समोरून वेगाने येणाºया ट्रकवर आदळली. अपघातात व्हर्ना गाडीतील पाचपैकी तिघे जागीच ठार झाले. त्यात हर्षल अनिल घोलप (२४, रा. गावठाण, रोखडी,पुणे), नारायण कृष्णा थोरात (२१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे ( २३ रा.बजाजनगर ,औरंगाबाद ) यांचा समावेश आहे. मारुती कारमधील वैभव राधाकृष्ण गटकळ (२१,रा. मातेरेवाडी जि.नाशिक) हा सुद्धा जागीच ठार झाला. येवला ग्रामीण रूग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अपघातात गौरव रामपालसिंग प्रजापती (२३,रा. सिडको, औरंगाबाद) व उमेश गोपाल भगत (रा.बजाजनगर, औरंगाबाद ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांनी ट्रकचालक नूर इब्राहीम शेख, (३५) याला अटक केली आहे.
येवल्यानजीक अपघातात चौघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:28 AM
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील मराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना मोर्चेकरी बांधवांवर काळाने झडप घातली.
ठळक मुद्दे मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघेमराठा मोर्चा आटोपून घराकडे परततांना अपघातअपघातात व्हर्ना गाडीचे प्रचंड नुकसान