नाशिक- सिक्कीम मध्ये दरड कोसळल्याने आपत्ती निर्माण झाली आहे. मात्र नाशिकहून गेलेले पर्यटक सुखरूप असल्याचे वृत्त आहे. वाहतूक कोळंबा झाल्यामुळे प्रवासी हळूहळू पुढे सरकत असले तरी कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचे टूर अँड टुरिस्ट व्यवसायिकांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे सिक्कीम मध्ये दरड कोसळली असून त्यामुळे देशातील अनेक पर्यटक या ठिकाणी अडकले आहेत. नाशिकहून गेलेले देखील अनेक पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे. मात्र सर्वजण सुरक्षित आहेत तर काहीजण तेथून बाहेर पडले आहेत, असे पर्यटन व्यवसायिकांनी सांगितले.
या संदर्भात तान या पर्यटन व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले की, बाग डोंगरा ते गंगटोक या रस्त्यावरती दोन ठिकाणी लँडसलाईड झाल्यामुळे रस्ता बदलला आहे. थोडेसे लांबून यावे लागत आहे. कॅलिंपोंग मार्गे वाहतूक सुरू आहे. परंतु काही अडचण नाही. सगळे लोक योग्य ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपले नाशिकचे जवळपास 30-40 लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण कुणी कुठे अटकलेले नाहीये. फक्त रस्ता व अंतर वाढले आहे, असे त्यांनी सांगितलं.