शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

गोदाकाठी राहणारे सारेच नाशिककर भाग्यवान - पं. प्रदीप मिश्रा

By suyog.joshi | Published: November 21, 2023 7:31 PM

महाशिवपुराण कथा सोहळ्यात गौरवोद्गार

नाशिक : प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पूनित झालेल्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचे पावित्र्य लाभलेल्या, सप्तश्रृंगी मातेने आशीर्वाद दिलेल्या आणि आद्य ज्योर्तिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या सान्निध्यात गोदाकाठी राहणारे सारेच नाशिकककर खरोखरच भाग्यवान असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी काढले. पाथर्डी गाव परिसरात पं. मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेस मंगळवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. दि. २५ नोव्हेंबरपर्यंत दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

कथा ऐकण्यासाठी विशेषत: उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी बोलतांना पं. मिश्रा म्हणाले, संसारात केवळ सुखच महत्वाचे नाही, तर आपण दुसऱ्यासाठी काय करतो, देवाची किती सेवा करतो हे महत्वाचे आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला हे आपले भाग्य असून ते जीवन आपण कसे सार्थकी लावतो यासाठी देवासाठी आपण काही तरी केले पाहिजे, आणि हाच योग आता आला आहे. आपण सर्वांनी शिवपुराण कथेचा लाभ घेत धन्य व्हावे असे आवाहन पं. मिश्रा यांनी केले. राज्यभरातील भाविकांनी कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने ठिकठिकाणी वाहतुक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यात आल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागला.