येवल्यात दूषित व गढूळ पाणीपुरवठा
सर्वपक्षीय नगरसेवकांची जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहराला सद्य:स्थितीत दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या शहरवासीयांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी (दि. २३) अचानकपणे जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने पालिकेने शहरात आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे. मृत साठ्यामुळे शहरात गढूळ, दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्रावर अचानक भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या जिवाशी नगरपालिकेचे प्रशासन खेळत असल्याचा आरोप या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. या वेळी उपनगराध्यक्ष सूरज पटणी, गटनेते प्रवीण बनकर, डॉक्टर संकेत शिंदे, गणेश शिंदे, निसार लिंबूवाले, रुपेश लोणारी, सचिन मोरे, दयानंद जावळे, शफिक शेख, अमजद शेख यांच्यासह सुनील शिंदे, प्रशांत शिंदे, शैलेश देसाई, संतोष परदेशी, मुश्ताक शेख, सलीम मुकादम, मलिक मेंबर, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.
इन्फो
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी ‘नॉट रिचेबल’
जलशुद्धीकरण केंद्राची दयनीय अवस्था पाहण्यासाठी नगरसेवकांनी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.
चांदवड नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे येवला नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याशी डॉ. संकेत शिंदे, गणेश शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आलम पावडर व ब्लिचिंग पावडरचा आपत्कालीन साठा नसल्याबाबत कानउघाडणी केली. दरम्यान, संध्याकाळपर्यंत संबंधित सामग्री हाती पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी सांगितले.
फोटो- २३ येवला वॉटर
येवला येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करताना सर्वपक्षीय नगरसेवक.
===Photopath===
230621\23nsk_33_23062021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ येवला वॉटर येवला येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करतांना सर्वपक्षीय नगरसेवक.