नाशिक : मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, त्यांच्यासाठी सुलभ मतदान केंद्र असावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर होती अशी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर येणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची तातडीने अंमलबाजवणी सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीदरम्यान निवडणूक आयोगाने सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर ठेवण्यात यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले होते. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रे ही पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर आहेत अशा मतदान केंद्रांची पडताळणी करून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांचेदेखील नियोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या ही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी असून, जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या ४५९६ इतकी आहे तर सहायकारी मतदान केंद्रे सुमारे १५० इतकी राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते शक्यतो त्याच मतदान केंद्रांवर विधानसभा निवडणुकीचेही मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांना त्याच मतदान केंद्रात मात्र तळमजल्यावर आता मतदानाची सोय होणार आहे. अपवादात्मक स्थितीत फक्त मतदान केंद्र बदलू शकते मात्र जिल्ह्यात तशी शक्यता कमीच आहे.तळमजल्याच्या केंद्रांसाठी प्रसंगीसरकारी, खासगी जागांचा पर्यायनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जी मतदान केंद्रे ही पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर आहेत ती मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यासाठी नजीक असलेल्या भागात उपलब्ध शासकीय इमारतीमध्ये व्यवस्था करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय इमारत नसल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार खासगी इमारतीमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. मात्र असे करताना भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेशदेखील देण्यात आलेले आहेत.४ अपवादात्मक स्थितीत तात्पुरते शेड उभारण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार आयोगाने दिले असून जिल्ह्यात मालेगावमध्ये तात्पुरते केंद्र उभारण्याची वेळ येऊ शकते असे समजते.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे येणार तळमजल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 1:03 AM
नाशिक : मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, त्यांच्यासाठी सुलभ मतदान केंद्र असावे यासाठी भारत निवडणूक ...
ठळक मुद्देतयारी विधानसभेची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघांतील मतदान केंद्रांची पडताळणी