लक्ष्मण ढोबळे : नांदूरशिंगोटेत संवाद अभियान यात्रेचे स्वागत
नांदूरशिंगोटे : बहुजनांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्याच्या उद्देशाने संवाद अभियान राबविले जात आहे. यातून बहुजनांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्यांना शिक्षण, आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करून जागृती करण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे बहुजन रयत संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ढोबळे बोलत होते. बहुजन रयत परिषद साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान १८ जुलै ते ५ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सुरेश कुचेकर यांच्या हस्ते ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. कुचेकर यांनी परिसरातील समाजातील असणाऱ्या विविध समस्या व अडचणी ढोबळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. ग्रामीण भागातील ठिकठिकाणी जाऊन बहुजनांच्या व्यथा जाणून घेऊन त्याचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकासात्मक बाबींचा शासनाकडून प्रामुख्याने पाठपुरावा करणे, बहुजन समाजातील महिलांचे सशक्तीकरण व सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रमेश गलफाडे, ॲड. कोमल साळुंखे, संदीप शेळके, सुरेश कुचेकर, शशिकांत येरेकर, संतोष कुचेकर, सोमनाथ जाधव, रामदास जाधव, योगेश गायकवाड, भाऊसाहेब लांडगे, गणेश महाडिक, रावसाहेब कांबळे, बाळासाहेब साळवे, राजेंद्र दराडे, प्रशांत सानप उपस्थित होते.
-----------------
नांदूरशिंगोटे येथे बहुजन रयत संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रमेश गलफाडे, कोमल साळुंके, सुरेश कुचेकर, संदीप शेळके, शशिकांत येरेकर, राजेंद्र दराडे, सोमनाथ जाधव आदी. (१९ नांदुरशिंगोटे १)
190721\19nsk_4_19072021_13.jpg
१९ नांदुरशिंगोटे १