तेलगी घोटाळा : रेल्वे स्टॅप चोरी प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 01:21 PM2018-12-31T13:21:35+5:302018-12-31T15:34:04+5:30

नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए क़े़ मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड़ ढिकले व अ‍ॅड़ एम़ वाय क़ाळे यांनी काम पाहिले़ 

All seven accused in the Telagi stamp scam get acquitted by court | तेलगी घोटाळा : रेल्वे स्टॅप चोरी प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

तेलगी घोटाळा : रेल्वे स्टॅप चोरी प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

Next
ठळक मुद्दे२००३ मधील प्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल २३ कोटी रुपयांचे स्टॅम्प चोरी प्रकरण

नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील एक़े़मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़बी़ घुमरे, अ‍ॅउ़ ढिकले व एम़वायक़ाळे यांनी काम पाहिले़ 

नाशिकरोडच्या भारत प्रतिभुती मुद्रणालयात छापले जात असलेले स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनद्वारे देशभरात पाठविले जातात़ मात्र, रस्त्यातच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे बोगीचे सील तोडून स्टॅम्पची चोरी करून ते अब्दुल करीम तेलगी यास विक्री करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, दिल्ली (सीबीआय) यांच्या आर्थिक गुन्हे शाखेस मिळाली होती़  त्यानुसार १६ डिसेंबर २००३ मध्ये गुन्हा दाखल करून नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ यामध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पवार, ब्रिजकिशोर तिवारी , विलासचंद्र जोशी, प्रमोद डहाके, मोहम्मद सरवर, विलास मोरे, ज्ञानदेव वारके यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़ 

नाशिकच्या विशेष न्यायालयात  सीबीआयने २००५ मध्ये हजारो पानी दोषारोपपत्र दाखल केले होते तर फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरूवात झाली होती़ यामध्ये सीबीआयचे वकील व आरोपीच्या वकीलांनी ४९ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणले या खटल्यात साक्षीदारांनी कोणाचीही नावे घेतली नाही तर काही साक्षीदारांनी सीबीआयने न सांगता जबाब घेतल्याचे सांगितले़

न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात सीबीआयने दाखल केलेले कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली़  तसेच स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे वा पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड़ एस़बी़ घुमरे, अ‍ॅउ़ ढिकले व एम़वायक़ाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़


 तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील महत्त्वाच्या बाबी
* २००३ मधील प्रकरण : नाशिकच्या जिल्हा न्यायालयात खटल्याची  सुनावणी
* आरोपींमध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश
* २३ कोटी रुपयांचे स्टॅम्पची चोरी झाल्याचा सीबीआयचा आरोप
* सरकारी वकील व आरोपींच्या वकीलांनी ४९ साक्षीदारांची तपासणी़
* खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीचा २०१७ मध्ये मृत्यू


निर्दोष मुक्तता झालेले आरोपी
रामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल)


नाशिक कोर्टात हजर झाला होता तेलगी
अब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षाही सुनावण्यात आल्या. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु जो पर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तो पर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला. तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैद्राबाद तर कधी बेंगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत या खटल्याचे कामकाज चालले, त्यात तो मृत्युपश्चात निर्दोष साबीत झाला.

Web Title: All seven accused in the Telagi stamp scam get acquitted by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.