नाशिक : महिनाभरापासून जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत कोरोनाचे संक्र मण वेगाने होत असून, मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून आले. तसेच याच भागातील बहुतांश कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या आयुक्तांनी दौरा करून या परिसराचा ‘संपर्क’ तोडण्यासाठी जुन्या नाशकात येणाऱ्या वाटा बंद करण्याचा निर्णय घेतला.जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, बागवानपुरा, काजीपुरा, चौक मंडई, नानावली, कथडा, मोठा राजवाडा या सर्वच भागात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढली. जुन्या नाशकात वेगाने फैलावणाºया कोरोनाला नियंत्रणात आणायचे तरी कसे? असा यक्ष प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला. कारण प्रचंड दाट लोकवस्ती, अरुंद गल्लीबोळ आणि घरे, शिक्षणाचा आणि सामाजिक नितीमूल्यांचा अभाव यामुळे या भागात कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. अद्यापही कोरोनाचे रुग्ण या भागात आढळून येतच आहे. जुन्या नाशकातील कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली असेल.काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. परिणामी शुक्र वारी (दि.१०) मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या भागाचा पुन्हा पाहणी दौरा करून जुन्या नाशकात जाणारे रस्ते तत्काळ बॅरिकेडिंग लावून बंद करण्याचे आदेश दिले. यानुसार आता केवळ मेनरोड, दहीपूल, सरस्वती नाला, तिवंधा लेन, भद्रकाली या भागातूनच जुन्या नाशकात ये-जा करण्याचे मार्ग मोकळे ठेवले गेले आहेत. उर्वरित सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहे.येथून प्रवेश बंदसारडासर्कलवरून दूधबाजार, चौकमंडईत जाणारे दोन्ही रस्ते. द्वारकावरून नानावली, बागवानपुºयात जाणारा रस्ता, तसेच फाळकेरोड, शिवाजी चौकातून तिगरानियाकडे जाणारा रस्ता, खडकाळी सिग्नल, वडाळानाका येथून जुन्या नाशकात येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीतील सर्वच वाटा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:48 PM
महिनाभरापासून जुने नाशिक भागातील दाट लोकवस्तीत कोरोनाचे संक्र मण वेगाने होत असून, मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून आले. तसेच याच भागातील बहुतांश कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या आयुक्तांनी दौरा करून या परिसराचा ‘संपर्क’ तोडण्यासाठी जुन्या नाशकात येणाऱ्या वाटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देकठोर निर्णय। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न