नाशिक : विधानसभा निवडणुकीपूर्वी डझनाहून अधिक धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून युतीला आव्हान देण्यास निघालेल्या कॉँग्रेस आघाडीने अखेरच्या टप्प्यात आपल्याच काही मित्रपक्षांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाºयावर सोडून दिले आहे. स्थानिक पातळीवर नामांकन मागे घेतल्यानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहून नाशिक जिल्ह्यात दोन्ही कॉँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षाला बाजूला सारून सोयीचे निर्णय घेतल्याने निवडणुकीपूर्वीच आघाडीची शकले उडाली आहेत.नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत युती विरुद्ध आघाडी अशी प्रमुख लढत असली तरी, काही मतदारसंघांमध्ये महाराष्टÑ नवनिर्माण सेनेनेही उमेदवार दिल्याने तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीचे चित्र आहे. अशी लढत लढताना कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या आघाडीतील मित्रपक्षांना जिल्ह्यातील काही जागा सोडण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कळवण व नाशिक पश्चिम या दोन मतदारसंघांची मागणी केली होती; मात्र कळवण मतदारसंघ राष्टÑवादीचा बालेकिल्ला मानला जात असल्याने राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. परिणामी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसही मैत्रीपूर्ण लढत देत आहे. तशीच परिस्थिती नाशिक पश्चिम मतदारसंघाबाबत झाली आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून गेल्या काही महिन्यांपासून तयारी करण्यात आली तर माकपानेदेखील या मतदारसंघावर कामगारवर्गाच्या भरवशावर दावा सांगितला. प्रारंभी राष्टÑवादीकडून माकपाला हा मतदारसंघ सोडल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पक्षाकडून ए व बी फॉर्म देण्यात आल्याने या मतदारसंघातही माकपाशी मैत्रीपूर्ण लढत होत आहे.नाशिक पूर्वमध्ये आघाडीचे उमेदवार आमने-सामनेनाशिक पूर्व मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात कॉँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आला होता; मात्र नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीने या मतदारसंघात भाजप बंडखोराला ए व बी फॉर्म देऊन नामांकन दाखल केले. तर कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने कॉँग्रेसने सदरची जागा कवाडे गटाला सोडली व त्यांनीही उमेदवारी दाखल केली. आघाडीतील दोन प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकले.नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता, भाजप विरुद्ध एकास एक लढत देण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सर्वांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने कॉँग्रेसने कवाडे गटाच्या उमेदवाराला माघारीसाठी गळ घातली; परंतु त्याने नकार दिल्याने अखेर कॉँग्रेसने कवाडे गटाच्या उमेदवाराला वाºयावर सोडून थेट राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आघाडीतील मित्रपक्ष आता स्वत:च्या बळावरच निवडणुकीला सामोरे जात आहेत.
जिल्ह्यात आघाडीकडून मित्रपक्ष वाऱ्यावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:34 AM
नाशिक : विधानसभा निवडणुकीपूर्वी डझनाहून अधिक धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करून युतीला आव्हान देण्यास निघालेल्या कॉँग्रेस आघाडीने अखेरच्या टप्प्यात आपल्याच ...
ठळक मुद्देमैत्रीपूर्ण लढत : माकप व रिपाइं (कवाडे) उमेदवारांचे ‘एकला चलो’