नाशिक : आकार वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना थंडी साठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या संस्थापिका अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिरडशेत येथील जिल्हा परिषद च्या शाळेत स्वेटर तसेच वह्या पुस्तके पेन पेन्सिल आधी स्टेशनरी वाटप करण्यात आली. फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या शैक्षणिक वर्षात अशा गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणकि खर्च उचलून त्यांना वर्षभर मदत करण्यात येईल असे प्रतिपादन स्मिता पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी फाउंडेशनच्या स्मिता पाटील, जया आढाव, शुभांगी डेंगळे, अरूणा राणे, मिनल महाजन, रंजना गुंजाळ, रु चिता गायधनी, शिल्पा सोनार, आशा शिंदे, नूतन पाटील, निवेदिता पारख, संगीता पवार, प्रतीभा जोहारले, स्नेहा वाळवे, माधुरी पाटील, सुजाता जोशी, शैलजा विसपुते, संगीता जाधव आदी उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:50 PM
आकार वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना थंडी साठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य व मिठाईचे वाटप
ठळक मुद्देआकार वेलफेयर फाउंडेशनतिरडशेत येथील विद्यार्थ्यांना थंडीसाठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य वाटप