नाशिक : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करण्याबरोबरच गावपातळीवर माफक दरामध्ये सॅनेटरी नॅपकिन आशामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्टÑीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.आरोग्य विभागांतर्गत मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीची सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनानुसार व जिल्हा परिषद आरोग्य सभापती यतींद्र पगार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या योजनेमार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना यतींद्र पगार यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सॅनेटरी नॅपकिनचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सहा रुपये किमतीत सॅनेटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहे. अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना एकूण लोकसंख्येमध्ये किशोरवयीन मुलींची संख्या अंदाजे १० ते ११ टक्के एवढी असल्याचे सांगत, जिल्ह्णासाठी १ लाख ६४ हजार ८०० सॅनेटरी नॅपकिनची पाकिटे सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर आशांमार्फत अल्पदरात उपलब्ध करण्यात आली आहे. असून १,५०,१०० किशोरवयीन मुलींनी याचा लाभ घेतला असल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी ग्रामीण भागात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी समितीची सभा ही दर महिन्याला जिल्हा तसेच तालुका स्तरावर घेण्यात यावी, असे निर्देश दिले. सभेस जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी यांच्यासह विविध विभागांचे पंधरा समिती सदस्य उपस्थित होते.
किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनेटरी नॅपकिनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 1:26 AM
नाशिक : ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीमधील स्वच्छतेविषयी घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करण्याबरोबरच गावपातळीवर माफक दरामध्ये सॅनेटरी नॅपकिन आशामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राष्टÑीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्दे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम समन्वय समितीची सभा